महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Konkan flood situation - आम्हाला आता राहते घर सोडावे लागेल, आपली खंत व्यक्त करताना चिपळूणमधील पूरग्रस्त कुटुंबाच्या डोळ्यात पाणी

महाराष्ट्रात नुकताच महापुराने धुमाकुळ घातला. यामध्ये कोकणातही या चा फटका बसला आहे. गावात पाणी शिरल म्हणेपर्यंत पाण्याचा लोंडा घराता घुसावा असे हे दिवस. हाताला लागेल ते उचलून आपला जीव वाचवण्याची मोठी कासावीस या काळात करावी लागली. या सगळ्या दुखा:च ओझ वाढवणाऱ्या आठवणींतून सावरायला येथील नागरिकाला काही महिने नव्हे, तर काही वर्ष जातील, इतक रितेपण येथे निर्माण झालय. अशाच प्रसंगातून येथील खेडेकर कुटुंब गेले आहे. त्याबाबत खेडेकर कुटुंबातील संपदा खेडेकर यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी-

खेडेकर कुटुंबातील संपदा खेडेकर पूर याला तेव्हा आपल्या घराची काय अवस्था झाली ते दाखवताना
खेडेकर कुटुंबातील संपदा खेडेकर पूर याला तेव्हा आपल्या घराची काय अवस्था झाली ते दाखवताना

By

Published : Aug 1, 2021, 7:26 PM IST

रत्नागिरी (चिपळूण) - चिपळूणचा महापूर ओसरून 8 दिवस उलटून गेले, पण महापुराने पाठीमागे सोडलेल्या खुणा हा पूर किती भयानक होता हे दाखवून देतात. शहरातील प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यांत पाणी आणणारा हा काळ होता. कुणाच्या घरात तान्ह लेकरु, तर कुणाच्या घरात आजारांनी ग्रासलेले 85 वर्षांचे वद्ध मंडळी. गावात पाणी शिरल म्हणेपर्यंत पाण्याचा लोंडा घराता घुसावा, असे हे दिवस. हाताला लागेल ते उचलून आपला जीव वाचवण्याची मोठी कासावीस या काळात करावी लागली. या सगळ्या दुखा:च ओझ वाढवणाऱ्या आठवणींतून सावरायला येथील नागरिकाला काही महिने नव्हे, तर काही वर्ष जातील, इतके रितेपण येथे निर्माण झालय. अशाच प्रसंगातून येथील खेडेकर कुटुंब गेले आहे. त्याबाबत खेडेकर कुटुंबातील संपदा खेडेकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी-

महाराष्ट्रात नुकताच महापुराने धुमाकुळ घातला. या पुराचा कोकणातही मोठा फटका बसला आहे. याबाबत चिपळूण येथील पेठमाप परिसरातील खेडेकर कुटुंबाशी संवाद साधला आहे, आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी-

'...तर आम्हाला राहते घर सोडावे लागेल'

या पुरात अनेकांनी अतिशय भयाण परिस्थिती अनुभवली, अनेकजण मृत्यूच्या दाढेतून परत आलेले आहेत. नदीकाठच्या नागरिकांची स्थिती तर अतिशय भयाण आणि गंभीर होती. या पुराचा त्यांनी केलेला सामना त्यांच्याकडून ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. चिपळूण शहरातल्या पेठमाप परिसरातील संपदा खेडेकर यांनी या भयानक परिस्थितीचा सामना अगदी जिद्दीने केला. त्यांनी मोठ्या कसरतीने आपल्या कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचवले. संपदा यांचे घर पेठमापमध्ये, वाशिष्ठी नदीच्या किनाऱ्यालगत आहे. दारातुनच वाहते पाणी आहे. मात्र, आत्ता आलेल्या पुराने जे रौद्र रुप दाखवले, त्यामुळे आता इथे राहायचे की नाही असा प्रश्न निर्माण झाल्याचे संपदा यांनी सांगितले. लवकरात लवकर येथे बंदारा बांधला नाही, तर आम्हाला राहते घर सोडावे लागेल अशी खंत संपदा यांनी व्यक्त केली आहे. हे सांगताना संपदा यांना गहिवरून आले होते.

'ग्रील तोडून पत्र्यावर चढून दुसऱ्या घरी प्रवास'

जेव्हा पूरस्थिती निर्माण झाली, त्यावेळी घरात 7 जण होते. या पुरात घराजवळची 8 ते 10 फूट जमीन नदीच्या पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेली, घराजवळची नारळाची झाडे तसेच अन्य झाडेही वाहून गेली. त्यामुळे परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज खेडेकर कुटुंबियांना आला. दरम्यान, पाणी वाढत होते. हे पाणी सुमारे 12 फुटांची पातळी ओलांडत होते. त्यावेळी जीव धोक्यात घालून संपदा यांनी हिम्मत केली आणि आपल्या कुटुंबाला घेत, यामध्ये 75 वर्षांचे संपदा यांचे सासरेही होते. त्यांना दम्याचा त्रास. हे सर्व धोके पत्करून संपदा यांनी वरच्या मजल्यावरच्या ग्रील तोडून पत्र्यावर चढून दुसऱ्या घरी गेले. यावेळी हा प्रवास आम्ही कसा केला हे आमची आम्हाला माहित अस संपदा म्हणाल्या. यावेळी संपदा यांच्या डोळ्यांत पाणी आले.

'...तर भयंकर संकट उभे राहू शकते'

नदीच्या बाजूने संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या ग्रामस्थांची आहे, ही मागणी आता पुन्हा जोर धरू लागली असून, याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे, अन्यथा इथल्या नागरिकांसमोर भविष्यात आणखी भयंकर संकट उभे राहू शकते, अशी भीतीही संपदा यांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details