रत्नागिरी - कोणी ऐरागैरा माझा राजकीय अस्त करू शकत नाही, असे प्रत्युत्तर म्हाडा अध्यक्ष आणि आमदार उदय सामंत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांना दिले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेची सर्व टीम आणि सामंत कंपनी निवडणुकीत निलेश राणेला बाद करायला निघाली आहे. पण निलेश राणेला बाद करणे एवढे सोपे नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंतचाच अस्त करू, अशी टीका निलेश राणे यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हाडा अध्यक्ष आणि आमदार उदय सामंत पत्रकार परिषदेत म्हणाले, की राणेंचे वक्तव्य बालिश आहे.