रत्नागिरी - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये प्रत्येकी १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा ग्राहकांच्या खिशाला फार फरक पडणार नसल्याची प्रतिक्रिया फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिऐशनने (फामपेडा) अध्यक्ष उदय लोध यांनी दिली.
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार नाही - उदय लोध - nirmala sitaraman
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये प्रत्येकी १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.
उदय लोध
उत्पादन कर वाढल्याने महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलमध्ये प्रति लिटर २.४५ रुपयांनी दर वाढले आहेत. गेल्या महिनाभरात पेट्रोल-डिझेलचे दर बघितले तर किंमती कमी झाल्या आहेत. पेट्रोल सव्वा रुपयांनी तर डिझेल सव्वादोन रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे एकूण दरवाढीचा ग्राहकांच्या खिशावर फार मोठा फरक पडेल असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया उदय लोध यांनी दिली आहे.