रत्नागिरी - गणेश विसर्जनावेळी राजापूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघेजण बुडाल्याची घटना घडली होती. पडवे बंदर येथे कुलदीप वारंग आणि ऋत्विक भोसले ही शाळकरी मुले तर, धोपेश्वर येथे सिद्धेश तेरवणकर हा 20 वर्षीय तरुण बुडाला होता. या तिघांचाही ग्रामस्थ तसेच पोलिसांकडून तत्काळ शोध सुरू करण्यात आला होता. यापैकी, ऋत्विक भोसलेचा मृतदेह दुपारनंतर जेटीजवळ सापडला आहे. इतर दोघेजण अद्यापही बेपत्ता असून शोधकार्य सुरू आहे.
राजापूरमध्ये गणेश विसर्जनावेळी बुडालेल्या तिघांपैकी 'दोघे' अद्यापही बेपत्ता - rajapur latest news
पडवे बंदर येथे कुलदीप वारंग आणि ऋत्विक भोसले ही शाळकरी मुले तर, धोपेश्वर येथे सिद्धेश तेरवणकर हा 20 वर्षीय तरुण बुडाला होता. यापैकी, ऋत्विक भोसलेचा मृतदेह दुपारनंतर जेटीजवळ सापडला आहे. इतर दोघेजण अद्यापही बेपत्ता असून शोधकार्य सुरू आहे.
राजापूरमध्ये गणेश विसर्जनावेळी बुडालेल्या तिघांपैकी 'दोघे' अद्यापही बेपत्ता
हेही वाचा -रत्नागिरीत गणेश विसर्जनावेळी दोन मुले खाडीपात्रात बुडाली; शोधकार्य सुरू
ऋत्विकआणि कुलदीप हे दोघेही पडवे गावातील टुकरूल वाडी येथील रहिवासी होते. ते गणपती विसर्जन करण्यासाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडली होती. तर, धोपेश्वर येथील नदीपात्रात गणेशविसर्जनावेळी सिद्धेश तेरवणकर हा तरूणदेखील बुडाला होता.