रत्नागिरी - पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना २० मिनिटे पेट्रोल पंप बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पंपावरील सर्व लाईट्स बंद ठेवण्यात आले होते.
देशातील ५६ हजार पेट्रोल पंप एकाच वेळी बंद; पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली - पुलवामा हल्ला
आजही हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातली ५ हजार, तर देशातील ५६ हजार पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते.
पेट्रोल पंप बंदू ठेवून वाहिली श्रद्धांजली
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात ४५ जवानांना वीरमरण आले. त्यांना संपूर्ण देशात श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मागणी देखील केली जात आहे. आजही हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातली ५ हजार, तर देशातील ५६ हजार पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. यावेळी आदरांजली वाहणारे फलकही लावण्यात आले होते. यावेळी पेट्रोल पंपावरील सर्व लाईट्स तसेच सर्व कामकाज बंद ठेवले होते.