रत्नागिरी - मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला असताना दुपारी सव्वादोनच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या माळनाका येथे रस्त्याकडेला असलेले झाड रस्त्यावर पडले. त्यामुळे रत्नागिरीच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली. मात्र, दुसऱ्या बाजूनी वाहतूक सुरू होती.
रत्नागिरीत संततधार, झाड पडल्याने वाहतूक खोळंबली
रत्नागिरी शहरात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड पडले. त्यामुळे रत्नागिरीच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली.
पाऊसामुळे पडलेले झाड
सुदैवाने झाड पडताना रत्यावर कुठले वाहन नसल्याने मोठी हानी टळली. दरम्यान, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नानंतर रस्त्यावरील झाड हटवले आहे.
Last Updated : Jul 10, 2019, 7:22 PM IST