रत्नागिरी - उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका पुन्हा एकदा मुंबई - गोवा महामार्गाला बसला आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे जगबुडी आणि वाशिष्ठी नदीच्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
रत्नागिरीत मुसळधार.. जगबुडी-वाशिष्ठी धोकादायक पातळीवर, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प - heavy rain
रत्नागिरीमधील मुसळधार पावसाचा फटका पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गाला बसला आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे जगबुडी आणि वाशिष्ठी नदीच्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
रात्री सुरू झालेला पाऊस अद्याप थांबलेला नाही. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. जगबुडी आणि वाशिष्ठी नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे वाशिष्ठी पुलावरील मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक 8.30 वाजता बंद करण्यात आली. तर जगबुडी पुलावरील वाहतूक 9.30 वाजता बंद करण्यात आली. तर परशुराम घाटात दरड कोसळल्याने या ठिकाणी वाहतूक एकेरी मार्गाने सुरू आहे.
दरम्यान वाशिष्ठी पुलावरून या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..