रत्नागिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा उद्यापासून कोकणात येत आहे. या यात्रेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागताचे फलक जिल्ह्यात झळकत आहेत. मात्र, यातील काही फलक हे अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत. खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडूनही मुख्यमंत्र्यांचे स्वागताचे बॅनर झळकत आहेत. तसेच शिवसेना-भाजप नेत्यांचे एकत्रित फोटो असलेले बॅनरही ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी भाजप-शिवसेनेसह राणेंकडूनही बॅनरबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा उद्यापासून कोकणात येत आहे. या यात्रेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागताचे फलक जिल्ह्यात झळकत आहेत. मात्र, यातील काही फलक हे अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत. खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडूनही मुख्यमंत्र्यांचे स्वागताचे बॅनर झळकत आहेत.
सिंधुदूर्गापासून रत्नागिरीपर्यंत यात्रा येणाऱ्या प्रत्येक ठिकाणी नारायण राणेंच्या स्वाभीमान पक्षाने होर्डींग उभारलेत. नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय तसेच राणेंचे कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांचा भाजप प्रवेश केव्हा होणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात असतानाच मुख्यमंत्र्यांच्या स्वागत लागलेले फलक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या होर्डिंगवर नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांचे फोटो आहेत. शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे एकत्रित फोटो असलेले बॅनरही झळकत आहेत. या सर्व बॅनरवरून सध्या रत्नागिरीत चर्चांना उधाण आले आहे.