रत्नागिरी -नाणार रिफायनरीवरून राज्याचे राजकरण तापले आहे. रिफायनरीच्या जागेवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. याला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दुजोरा दिला असून, आपल्याला चांगले प्रकल्प राज्यात हवे आहेत. नाणारमध्ये ( Aditya Thackeray comment on Nanar refinery) प्रकल्प होणार नाही, आपण दुसरे ठिकाण मागितले आहे. पण, ते ठिकाण घेत असताना स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच पुढे जाऊ, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. चिपळून तालुक्यातील सावर्डे येथे दि. गोविंदराव निकम यांच्या समाधीस्थळाचे त्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
माहिती देताना मंत्री आदित्य ठाकरे हेही वाचा -महाराष्ट्र लवकरच पूर्णतः निर्बंध मुक्तीकडे, मास्क सक्ती उठणार
माझे आज सकाळी मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले. त्यांनीही प्रकल्प आणल्यास स्थानिकांना विश्वासात घेऊनच सर्व काही करणार असल्याचे सांगितले आहे. नाणारमध्ये प्रकल्प होणारच नाही. दुसरे ठिकाण मागितले आहे, पण ते ठिकाण आणत असताना स्थानिक भूमिपुत्रांचे न्याय हक्क कसे अबाधित राहितील याकडे लक्ष देऊन त्यांना विश्वासात घेऊनच आपण पुढे जाऊ, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
रिफायनरीसाठी आपण एक जागा बघितली आहे, अजून एक दोन जागा आहेत. जागा उपलब्ध करून देणे हे राज्य सरकारचे काम असते. जागा आपण उपलब्ध करून देऊ. हे सर्व करत असताना स्थानिकांशी संवाद साधणे हा देखील एक महत्वाचा भाग आहे, तेही आम्ही करू. रिफायनरी महाराष्ट्रात आणण्याचे आमचे प्रयत्न आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा -Electricity Workers Call Off Strike : राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा.. संप मागे घेण्याची कर्मचाऱ्यांची घोषणा