महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाणार पंचक्रोशीत ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण; आंदोलकांचे गुन्हे मागे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाणार प्रकल्प

नाणार पंचक्रोशीमधील ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले आहे. नाणार रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरीस गुन्हे मागे घेण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी घेतला. या निर्णयानंतर ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत त्यांनी या निर्णयाचा स्वागत केले आहे.

nanar project
नाणार पंचक्रोशीत ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण; आंदोलकांचे गुन्हे मागे

By

Published : Dec 3, 2019, 3:12 PM IST

रत्नागिरी -नाणार पंचक्रोशीमधील ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले आहे. नाणार रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी घेतला. या निर्णयानंतर ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत त्यांनी या निर्णयाचा स्वागत केले आहे. काही दिवसांपूर्वी नाणार रिफायनरीसंदर्भात आंदोलन करताना मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला होता. व जमाबंदीचा आदेश डावलल्याप्रकरणी33 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

नाणार पंचक्रोशीत ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण

हेही वाचा - थर्डक्लास पक्षात जाऊन कारकीर्द संपवायची नाही; विश्वजीत राणेंचा सेनेवर घणाघात

अनेक वर्षानंतर आम्ही या निर्णयामुळे दिवाळी साजरी करू अशी प्रतिक्रिया गुन्हे दाखल असलेल्या आंदोलकांनी दिली आहे. ज्यांनी आंदोलन केली, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले हे सगळेच प्रकल्पग्रस्त आता आनंदीत दिसत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून इथे कोणतेही सण साजरे केले गेले नाहीत मात्र दाखल झालेले गुन्हे आता मागे घेण्याच्या निर्णयामुळे प्रकल्पग्रत आनंदीत आहेत. तसेच जनतेच राज्य आले असल्याची भावनाही इथले प्रकल्पग्रस्त व्यक्त करत आहेत. खऱ्या अर्थांनी या प्रकल्पग्रस्तांना मुख्यमंत्र्यांनी न्याय दिल्याची भुमिका गुन्हे दाखल असलेल्या आंदोलकांनी दिलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुन्हे मागे घेण्याच्या निर्णय घेतल्यानंतर हे गुन्हे दाखल आहेत त्या आंदोलकांशी 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी संवाद साधला आहे.

हेही वाचा - 'नाणार' विरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details