महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसांना मारहाण करत त्यांचीच दुचाकी घेऊन पसार झालेला गुन्हेगार अखेर जेरबंद

पकडायला आलेल्या पोलिसांना मारहाण करत त्यांचीच दुचाकी घेऊन पसार झालेल्या गुन्हेगाराला अखेर जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाला यश आले आहे.

crime
आरोपी व पोलीस

By

Published : Mar 6, 2021, 4:35 PM IST

रत्नागिरी-पकडायला आलेल्या पोलिसांना मारहाण करत त्यांचीच दुचाकी घेऊन पसार झालेल्या गुन्हेगाराला अखेर जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाला यश आले आहे. खेडशी परिसरात या संशयित आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

असा झाला होता फरार संशयित आरोपी हेमंत

जिल्ह्यातील एका गुन्ह्यात संशयित आरोपी हेमंत पांडुरंग देसाई पोलिसांना हवा होता. त्याच्यावर यापूर्वी विविध पोलीस स्थानकात गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात तो जामिनावर सुटला होता. त्यानंतर त्याने गुन्हे केल्याच्या शक्यतेने तो पोलिसांना हवा होता. शुक्रवार (19 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हेमंत देसाई हा उद्यमनगर येथे आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी प्रविण खांबे, दत्तात्रेय कांबळे यांना मिळाली होती. त्यानुसार दोन्ही कर्मचारी त्याला पकडण्यासाठी उद्यमनगर येथे गेले होते. पोलिसांना पाहिल्यानंतर हेमंतने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. यावेळी हेमंतने पोलीस कर्मचारी प्रवीण खांबे यांच्या हाताच्या मनगटाला चावा घेऊन तसेच पोलिसांवर दगड मारुन खांबे यांचीच मोटारसायकल घेऊन तेथून पळून गेला होता. दोन पोलिसांना चावून हेमंत पळून गेल्यानंतर त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह शहर, ग्रामीण पोलीसांची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती.

हेही वाचा -रत्नागिरी जिल्ह्याच्या तापमानात वाढ, हापूस होरपळतोय

सापळा रचून कारवाई

कर्मचाऱ्यांना चावून पळणाऱ्या हेमंत देसाई विरोधात शहर पोलीस स्थानकात भा.दं.वि.क. 307, 353, 37 व 9 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, हेमंत शुक्रवारी खेडशी परिसरात येणार असल्याची खबर मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने खेडशीसह चाँदसूर्या, हातखंबा आदी ठिकाणी सापळा रचला होता. याचदरम्यान हेमंत हा हातखंब्याच्या दिशेने खेडशीकडे येत असताना चाँदसूर्या दरम्यान त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

हेही वाचा -गारपिटीमुळे जिल्ह्यात १०० हेक्टरवरील पिकांचं नुकसान, प्राथमिक सर्वेक्षणात माहिती

हेही वाचा -एलईडीचा वापर करून जिल्ह्याच्या हद्दीत मासेमारी करणाऱ्या गोव्यातील नौकेवर कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details