रत्नागिरी- कोरोनाचा मुंबई भोवतीचा विळखा वाढत आहे. पण राज्य सरकार मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. रत्नागिरीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुंबईतील कोरोनाचे आकडे लपवले जातायेत. हेही वाचा-लाॅकडाऊन: दिव्यांग करतोय एका पायाने 400 किमीचा प्रवास...
राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातही मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दररोज मोठ्या संख्येने वाढत आहे. मात्र, मुंबईतील सत्य परिस्थिती बाहेर येत नसल्याचे भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी म्हंटले आहे. मुंबईतील 12 ते 13 झोनमधून कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. हा आकडा येत्या काही दिवसांत 10 हजाराच्या पलीकडे जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे रँडम टेस्टिंग झाले पाहिजे, त्यामध्ये प्रत्येकाचे इनिशियल टेस्टिंग झाले पाहिजे, त्यातून खरा आकडा बाहेर येईल, असे प्रसाद लाड म्हणाले.
दरम्यान, कोरोनाच्या संकटात भाजपने राजकारण केले म्हणून भाजप ट्रोल होत आहे असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. यालाही प्रसाद लाड यांनी उत्तर दिल आहे. भाजप सामाजिक भावनेतून काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे कुणी पेड लोकं ठेवली आहेत, कुठल्या पेड लोकांच्या माध्यमातून ट्रोल केले जात आहे. त्याचा शोध जयंत पाटील यांनी घ्यावा. सध्या गृहखाते हे राष्ट्रवादीकडे असल्याचा उपरोधीक टोलाही आमदार प्रसाद लाड यांनी जयंत पाटील यांना लगावला आहे.