रत्नागिरी- गुहागर तालुक्यातील जानवळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एका शिक्षकाने दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनिसोबतअश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत गुहागर पोलिसात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या शिक्षकावर 376 कलमाअतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. उदय वेल्हाळ, असे त्या शिक्षकाचे नाव आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर हा शिक्षक पळून गेला होता.
त्यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढत बेदम चोप दिला आणि या नराधम शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, आज सकाळी या 56 वर्षीय शिक्षकाला बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत (पोक्सो) अटक करण्यात आली. शिक्षकाच्या या प्रकारामुळे गुहागर तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - कोरोना विषाणूंमुळे माशांच्या निर्यातीत 30 ते 40 टक्क्यांची घट.. निर्यातदार चिंतेत