रत्नागिरी-रत्नागिरीतील दाभोळ समुद्रात दोन संशयित बोटी आढळून आल्याने एकच खळबळ उडली आहे. येथील एका बोटीने सॅटेलाईट फोनचा वापर केल्याची माहिती प्रथम कोस्टगार्डला मिळाली. कोस्टगार्डने ही माहिती दाभोळ पोलिसांना दिली व तातडीने दोन्ही बोटींची तपासणी केली. बोटीवरील सॅटेलाईट फोन ताब्यात घेण्यात आला असून या बोटीवरील ३८ जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत.
दाभोळ समुद्रात दोन संशयित बोटी आढळल्याने खळबळ, एका सॅटेलाईट फोनसह ३८ जण ताब्यात - ats
रत्नागिरीतील दाभोळ समुद्रात दोन संशयित बोटी आढळून आल्या आहेत. या बोटी ताब्यात घेतल्या असून बोटीवरील ३८ जणांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
दाभोळ समुद्रात दोन संशयित बोटी आढळल्याने खळबळ उडाली आहे.
कोस्ट गार्ड आणि दाभोळ पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या ३८ जणांची चौकशी करण्यात येत आहे. बोटींवरील कागदपत्रांची देखील तपासणी करण्यात येते आहे. या बोटी चीन आणि इंडोनेशियाच्या असल्याचे समजत आहे. यातील काही जणांचे पासपोर्ट देखील संपलेला आहे.
या बोटी दाभोळच्या समुद्रात काशासाठी आल्या होत्या, सॅटेलाईट फोनचा वापर का केला होता, या सगळ्याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे.