रत्नागिरी:गुजरात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले, आता कर्नाटकची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील गावच्या गावं कर्नाटकला जोडण्याचा डाव आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare Critics on Government ) यांनी केली आहे. त्या शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजामध्ये एल्गार मोर्चात बोलत ( Sushma Andhare in Ratnagiri ) होत्या.
Sushma Andhare : कर्नाटकची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील गावे कर्नाटकला जोडण्याचा डाव - सुषमा अंधारे
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून ( MH KN Border Dispute ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य व केंद्र सरकारवर टीका केली आहे. कर्नाटकची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील गावच्या गावं कर्नाटकला जोडण्याचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
सरकारवर जोरदार टीका:सरकार सामान्य लोकांच्या प्रश्नांवर उत्तरे देत नाही. जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे प्रश्न उपस्थित केले जातात तेव्हा आमचा आवाज बंद करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात, असा आरोप करत केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर सुषमा अंधारेंनी जोरदार टीका केली.
ठाकरे गटाचा एल्गार मोर्चा:लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शिवसेना (ठाकरे गट) उपनेते, आमदार राजन साळवी यांच्या होत असलेल्या चौकशीच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने शुक्रवारी लांजा येथे एल्गार मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेच्या फायरब्रँड उपनेत्या सुषमा अंधारे या मोर्चात सहभागी झाल्या होत्या, त्यानंतर त्यांची जाहीर सभा झाली.