रत्नागिरी - पुण्यातील एनडीआरएफ आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासन यांच्या वतीने येथील शिर्के हायस्कूलमध्ये एनडीआरएफच्या जवानांकडून विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरवले आहेत. तिवरे धरण दुर्घटना आणि जिल्ह्यात होणारे भूस्सखलन या पार्श्वभूमीवर येथे जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. पाच हायस्कूलमधील विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. यासाठी एनडीआरएफ टीम कमांडर राजेश यावले यांच्या नेतृत्वाखाली पंधरा जणांची टीम येथे आली आहे.
रत्नागिरीत एनडीआरएकडून विद्यार्थ्यांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
एखादी आपत्ती घडल्यास कशा पद्धतीने बचावकार्य करावे, आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या साधन सामुग्रीचा वापर केला जातो, याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.
विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या साधनांची माहिती देताना एनडीआरएफचे जवान
एखादी आपत्ती घडल्यास कशा पद्धतीने बचावकार्य करावे, आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या साधन सामुग्रीचा वापर केला जातो, याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. आपल्याकडील उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीच्या माध्यमातून एखाद्याला कशी मदत करता येते, याची माहीती एनडीआरएफ कडून देण्यात आली.
बचावकार्याबाबत जनजागृती व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हे अभियान हाती घेण्यात आले आहे. पुढील पंधरा दिवस हे अभियान जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये घेण्यात येणार आहे.