रत्नागिरी -एसटीचा 71 वा वर्धापन दिन रत्नागिरीत उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त एसटी प्रशासनाकडून शहरातील रहाटागर बसस्थानकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एसटी हा सर्व सामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. एसटीमुळे ग्रामीण भागाचा विकास होत आहे. प्रवाशांना एसटी बस हे हक्काचे साधन आहे. एसटीतून प्रवास करताना कधीही गैरसोय जाणवत नसल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी यावेळी म्हणाल्या. त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
यावेळी साळवी म्हणाल्या की, मागील 71 वर्षांच्या काळात एसटी महामंडळाने ग्रामीण भागात मोठी वाहतूक सुविधा पुरवली आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची एसटी ही जीवनवाहिनी आहे. एसटी महामंडळातही परिवर्तन होत असून, शिवशाही सारख्या आरामदायी गाड्या एसटीच्या ताफ्यात आल्या आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या महामंडळाचा डोलारा सांभाळताना थोड्या त्रुटी असणारच पण प्रवासी आणि नागरिकांनी एसटीप्रती नेहमीच सहकार्याची भावना ठेवावी.