रत्नागिरी - लांजा तालुक्यातील पालूमधील हुंबरवणेवाडी येथील रस्त्याची समस्या अनेक वर्षांपासून मार्गी न लागल्याने येथील ग्रामस्थांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. आज महाराष्ट्र दिनी हे ग्रामस्थ रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
रस्त्याचा प्रश्न सुटेना, हुंबरवणेवाडीवासीयांचे उपोषण - street
हुंबरवणे, पालू हा डोंगराळ भाग आहे. पालू ते हुंबरवणे असा 9.3 किमीचा रस्ता आहे. मात्र केवळ पाच किलोमीटरचा रस्ताच अद्याप झालेला नाही.
हुंबरवणे, पालू हा डोंगराळ भाग आहे. पालू ते हुंबरवणे असा 9.3 किमीचा रस्ता आहे. मात्र केवळ पाच किलोमीटरचा रस्ताच अद्याप झालेला नाही. हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून प्रस्तावित असून प्रशासन त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या वाडीची लोकसंख्या 300 इतकी आहे. मात्र रस्ता नसल्याने या गावातील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यासाठी प्रशासन तसेच राजकीय नेत्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्यांनीही याप्रश्नाकडे दुर्लक्षच केले. अखेर ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला असून, आज हुंबरवणेवाडीतील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.