महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बँकांच्या विलिनीकरणाविरोधात बँक कर्मचारी एकवटले, रत्नागिरीत संप - strike of bank employees

देशातील दहा बँकाच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. याच विलिनीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी मंगळवारी देशव्यापी संप पुकारला. रत्नागिरीतही हा संप पुकारण्यात आला.

बँकांच्या विलिनीकरणाविरोधात संप

By

Published : Oct 22, 2019, 11:12 PM IST

रत्नागिरी- भारत सरकारकडून देशातील दहा बँकाच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. याच विलिनीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी मंगळवारी देशव्यापी संप पुकारला. रत्नागिरीतही हा संप पुकारण्यात आला. यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी निदर्शने करत सरकारच्या या धोरणाचा निषेध नोंदवला.

हेही वाचा - मुंबईत बँक कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आज पुन्हा संप

या निर्णयाविरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि फेबी या संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला. सरकार एकीकडे सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद करत आहे. तर दुसरीकडे खासगी क्षेत्रातील स्मॉल फायनान्स बँकांना परवाने दिले जात आहेत. सरकारचे हे धोरण मागील दरवाजाने बँक व्यवसायाचे खासगीकरण करणारे असल्याचा आरोप करत संप पुकारण्यात आला.

बँकांच्या विलिनीकरणाविरोधात संप

याविषयीची माहिती रत्नागिरी बँक कर्मचारी समन्वय समितीचे सरचिटणीस राजेंद्र गडवी यांनी दिली आहे. या संपात जिल्ह्यातील जवळपास एक हजार कर्मचारी सहभागी झाले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. संपकरी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करत सरकारच्या या निर्णयाचा विरोध दर्शवला.

हेही वाचा - इकबाल मिर्चीचा हस्तक हुमायून मर्चंटला ईडीकडून अटक, प्रफुल पटेलांच्या अडचणीत वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details