रत्नागिरी -जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात आजपासून (शुक्रवार) कडक लॉकडाऊन सुरू करण्यात आला. 9 जूनपर्यंत हा कडक लॉकडाऊन असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या लाॅकडाऊनची कडक अमंलबजावणी केली जात आहे. पोलिसांकडूनही याबाबत कडक अंमलबजावणी केली जात आहे.
कडक लॉकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर - ratnagiri corona updates
रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करून पोलीस येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनांवर नजर ठेवून आहेत. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर देखील कारवाई केली जात आहे.
पोलिसांची करडी नजर
पोलिसांची करडी नजर
दरम्यान लॉकडाऊनचा भंग करून जे विनाकारण गाड्या घेऊन बाहेर पडत आहेत, त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर असून कारवाई केली जात आहे. रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करून पोलीस येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनांवर नजर ठेवून आहेत. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर देखील कारवाई केली जात आहे.