महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 24, 2020, 11:57 AM IST

Updated : Apr 24, 2020, 2:29 PM IST

ETV Bharat / state

पार्सल ट्रेनने रत्नागिरीचा 'हापूस' अहमदाबादला रवाना, वाहतूक खर्चही कमी

कोरोनामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने आंबा व्यावसायिकांचा आंबा राज्यात व राज्याबाहेर पाठवण्यात कोकण रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. रस्ते वाहतुकीपेक्षा कमी दरात आंब्याची वहातूक कोकण रेल्वेच्या माध्यमातून होत आहे. 27 एप्रिलपासून कोकण रेल्वेच्या मार्गावर दुसरी पार्सल ट्रेनही धावणार आहे

पार्सल ट्रेनने रत्नागिरीचा आंबा अहमदाबादला रवाना
पार्सल ट्रेनने रत्नागिरीचा आंबा अहमदाबादला रवाना

रत्नागिरी- विशेष पार्सल ट्रेनने रत्नागिरीचा हापूस आंबा अहमदाबाद येथे पाठवण्यात आला आहे. गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास ही विशेष ट्रेन रत्नागिरी स्थानकावर आली. या ट्रेनने जवळपास 40 पेटी आंबा अहमदाबादला पाठविण्यात आला आहे. कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे, या कठीण परिस्थितीत कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणासह दक्षिणेकडील राज्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे.

पार्सल ट्रेनने रत्नागिरीचा आंबा अहमदाबादला रवाना

याकरता कोकण रेल्वेच्या मार्गावर रो-रो व मालगाडीच्या बरोबरच स्पेशल पार्सल ट्रेन चालवल्या जात आहेत. याच स्पेशल पार्सल ट्रेनमधून गुरुवारी रात्री केरळमधून केळीचे चिप्स कोकणात दाखल झाले. केरळमधून आलेले हे चिप्स कणकवली आणि रत्नागिरी स्थानकात उतरवले गेले. याचबरोबर उड्डपी येथून मडगाव येथे तीन टन माल उतरवला गेला. त्यानंतर या विशेष पार्सल ट्रेनमधून रत्नगिरीचा हापूस आंबा अहमदाबाद येथे पाठवण्यात आला.

पार्सल ट्रेनने रत्नागिरीचा आंबा अहमदाबादला रवाना

कोरोनामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने आंबा व्यावसायिकांचा आंबा राज्यात व राज्याबाहेर पाठवण्यात कोकण रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. रस्ते वाहतुकीपेक्षा कमी दरात आंब्याची वहातूक कोकण रेल्वेच्या माध्यमातून होत आहे. 27 एप्रिलपासून कोकण रेल्वेच्या मार्गावर दुसरी पार्सल ट्रेनही धावणार आहे

Last Updated : Apr 24, 2020, 2:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details