महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 4, 2020, 10:27 PM IST

ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा २ हजाराच्या घरात; 24 तासांत 60 नवे रुग्ण

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 2000 जवळ पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 60 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 992 झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 66 झाली आहे.

कोरोना न्यूज
कोरोना न्यूज

रत्नागिरी - जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 2 हजार जवळ पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 60 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 992 झाली आहे. नव्याने सापडलेल्या 60 रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 20, कामथे 28, कळंबणी 2, गुहागर 6, दापोली 2, ॲन्टीजेन टेस्ट 2 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, 31 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 335 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये कोविड रुग्णालय 6, समाजकल्याण मधील 9 आणि केकेव्ही, दापोली येथील 16 रुग्ण आहे.

मृतांचा आकडा 66 वर

कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. कोकणनगर, रत्नागिरी येथील 65 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तसेच, राजापूर येथील 58 वर्षीय तर हर्णे, दापोली येथील 67 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 66 झाली आहे.


16 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 18 हजार 861 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 18 हजार 452 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1992 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 16 हजार 448 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 409 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 409 अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये घरडा केमिकल्सच्या खाजगी लॅबचे आकडे समाविष्ट नाहीत.

ABOUT THE AUTHOR

...view details