रायगड - ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. हा दिवस महाराष्ट्र राज्यात उत्सव म्हणून साजरा केला जातो. उरण पंचायत समितीमध्ये सुद्धा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला आहे. यावर्षीपासून शिवराज्याभिषेक सोहळा राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने हा सोहळा साजरा करण्यात आला आहे.
राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने सोहळा संपन्न
शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्र राज्यातील महत्वाचा सोहळा म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. म्हणून या दिवशी हा सोहळा रायगडावर साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षीपासून हा सोहळा ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी भगव्या ध्वजासह स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करावे व राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करुन कार्यक्रम संपन्न करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.