महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घोटाळ्यांमध्ये कारकीर्द घालवणाऱ्यांनी मला गोष्टी शिकवू नयेत - विनायक राऊत - nilesh rane

'खंबाटा एम्प्लॉइज क्रेडिट सोसायटी' ही कोणाच्या ताब्यात होती, करारावर किती संघटनांच्या प्रतिनिधींच्या सह्या होत्या. हे आधी आपल्या बंधूना विचारावे, असा टोला लगावत खंबाटा प्रकरणावरून निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्त्युत्तर दिले.

खासदार विनायक राऊत

By

Published : Apr 2, 2019, 4:50 PM IST

Updated : Apr 2, 2019, 6:25 PM IST

रत्नागिरी - आपली वाटचाल घोटाळ्यामध्ये घालवणाऱ्यांनी मला गोष्टी शिकवू नयेत, 'खंबाटा एम्प्लॉइज क्रेडिट सोसायटी' ही कोणाच्या ताब्यात होती, करारावर किती संघटनांच्या प्रतिनिधींच्या सह्या होत्या. हे आधी आपल्या बंधूना विचारावे, असा टोला लगावत खंबाटा प्रकरणावरून निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्त्युत्तर दिले. ते आज रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

खासदार विनायक राऊत

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी खंबाटा प्रकरणावरून राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. राऊत यांनी २७०० कामगारांना देशोधडीला लावून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राणे यांनी केला होता. तसेच नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत विकासकामांवरून त्यांना लक्ष्य केले होते.

या आरोपांचे खंडन करताना खासदार विनायक राऊत म्हणाले, की खंबाटा एव्हिएशनमध्ये ३ कामगार संघटना कार्यरत होत्या. त्यामध्ये भारतीय कामगार सेना, महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना, आणि ऑफिसर्स असोसिएशन संघटना यांचा समावेश होता. २०१० आणि २०१४ मध्ये करार झाले, त्यावेळी त्या करारांवर महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या अध्यक्षांची देखील सही होती. ही समर्थ कामगार संघटना कोणाची आहे, हे सर्वश्रुत आहे. निलेश राणे यांनी आरोप करण्यापूर्वी आपल्या बंधूंकडून त्याबाबत व्यवस्थित माहिती घ्यावी आणि मगच आरोप करावेत, असा टोला खासदार राऊत यांनी यावेळी लगावला.

खंबाटा एम्प्लॉइज क्रेडिट सोसायटी ही महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेकडे होती. कामगारांची देणी या क्रेडिट सोसायटीत अडकली आहेत. ही देणी मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू असल्याचे सांगून व्यवस्थापणाचा बेशिस्तपणा आणि मालकाचे दुर्लक्ष यामुळेच खंबाटा बंद पडल्याचे राऊत यांनी सांगितले.

मला कोणाच्या आरोपांना उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही, आपली वाटचाल घोटाळ्यामध्ये घालवणाऱयांनी मला गोष्टी शिकवू नयेत, मी ज्या क्षेत्रात काम करतो, त्या ठिकाणी प्रमाणिकपणेच काम करतो, असे खडेबोल राऊत यांनी सुनावले

Last Updated : Apr 2, 2019, 6:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details