रत्नागिरी - ठाकरे सरकारला आव्हान देणं हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना झेपणारं नाही. तसा प्रयत्न त्यांनी करू नये, असं म्हणत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले आहेत. नवीन फिल्म सिटीसंदर्भात ते बाॅलीवूड कलाकारांसोबत चर्चा करत आहेत.
योगींच्या दौऱ्यामुळे मुंबईतलं फिल्म इंडस्ट्रीचं महत्व कमी होणार नाही
याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, योगी आदित्यनाथांना वाटत असेल तर त्यांनी फिल्म इंडस्ट्री त्यांच्या राज्यात जरूर करावी. पण मुंबईत फिल्म इंडस्ट्रीचं असलेलं महत्व हे योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यामुळे कुठेही कमी होणार नाही असं म्हणत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा -युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत; शेअर बाजारात केले लखनऊ बाँडचे अनावरण
हेही वाचा -सेल्फीच्या मोहाने गमाविला जीव; गोदावरी नदीच्या पात्रात पडून नवविवाहितेचा मृत्यू