रत्नागिरी- जिल्हा रुग्णालयातील शिवभोजन थाळी योजनेत गोलमाल झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील ठेकेदाराच्या बिलातून संबंधित रक्कम कापून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.
शिवभोजन बोगस लाभार्थी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई; रक्कम वसुलीचे दिले आदेश
जिल्हा शासकीय रुग्णालयातील ठेकेदाराचीच माणसे शिवभोजन थाळी योजनेत लाभार्थी म्हणून दाखवण्यात आले होते. याचा भांडाफोड झाल्यावर प्रशासनाकडून चौकशीसाठी नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली होती. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा-LIVE : प्राध्यापिका जळीतकांड; हिंगणघाटमध्ये कडकडीत बंद, मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर
काही दिवसांपूर्वी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश अन्न व पुरवठा विभागाने दिले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयातील ठेकेदाराचीच माणसे या योजनेचे लाभार्थी म्हणून दाखवण्यात आले होते. याचा भांडाफोड झाल्यावर प्रशासनाकडून चौकशीसाठी नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली होती. नायब तहसीलदार यांच्या अहवालानुसार संबंधित ठेकेदार हा दोषी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी रक्कम वसुलीचे आदेश दिले आहेत.