रत्नागिरी - शिवसेनेचे जिल्हा परिषद शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी शिवबंधून सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांनी आपल्या पदाचा आणि शिवसेना पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बेटकर हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, भास्कर जाधव शिवसेनेत आल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. त्यामुळे बेटकर यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. आता ते जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत.
विधानसभा निवडणूक 2019 : सहदेव बेटकरांनी सोडले 'शिवबंधन', राष्ट्र्वादीकडून लढवणार निवडणूक - sahdev betkar left shivsena
भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि जि. प. शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांची नावे शिवसेनेकडून चर्चेत होती. मात्र, जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे या दोघांचीही नावे मागे पडली. यामुळे सचिन कदम यांनीही पाऊल मागे घेत पक्षादेश स्विकारला. मात्र, बेटकर यांनी बंडाचा झेंडा फडकावत पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -'कमळ' हाती घेता घेता, आमदार भारत भालकेंनी हातात बांधले 'घड्याळ'
भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि जि. प. शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांची नावे शिवसेनेकडून चर्चेत होती. मात्र, जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे या दोघांचीही नावे मागे पडली. यामुळे सचिन कदम यांनीही पाऊल मागे घेत पक्षादेश स्विकारला. मात्र, बेटकर यांनी बंडाचा झेंडा फडकावत पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. बेटकर आता गुहागर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार आहेत.