रत्नागिरी- रिफायनरी समर्थकांनीही आता एल्गार पुकारला आहे. शिवसेनेच्या सभेच्या दुसऱ्याच दिवशीच नाणार रिफायनरीसाठी समर्थकांची जाहिर सभा होणार आहे. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने या सभेचे आयोजन केले आहे. रविवारी शिवसेनेने या प्रकल्पाच्या विरोधात जाहीर सभेचे आयोजन केले आहे. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी रिफायनरी समर्थकांची सभा होणार आहे.
रिफायनरीवरून वातावरण तापले, रिफायनरी समर्थकांची सोमवारी जाहीर सभा - Shiv Sena Latest News
नाणाक रिफायनरी समर्थकांनीही आता पुकारला आहे. शिवेसनेच्या रविवारी होणाऱ्या सभेनंतर रिफायनरी समर्थकांची जाहिर सभा होणार आहे.
रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी आता समर्थकही आक्रमक झाले आहेत. समर्थक पहिल्यांदाच जाहीर सभा घेणार आहेत. कोकण जणकल्यान प्रतिष्ठानसह नाणार रिफायनरीच्या समर्थनामध्ये असलेल्या विविध संघटना या सभेत सहभागी होणार आहेत. राजापुरातील डोंगर तिठा येथे सोमवारी दुपारी २ सुमारास ही जाहिर सभा होणार आहे. प्रशासनाने सभा घेण्यास परवानगी दिली आहे. समर्थक संघटनांसह काही स्थानिक राजकीय पक्षांना देखील या सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी नाणार रिफायनरी समर्थनाचा ठराव जाहिर सभेत घेतला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात रत्नागिरीसह कोकणात नाणार रिफायनरीवरून वातावरण तापणार आहे.