रत्नागिरी -अधिसूचना रद्द करण्यात आलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविल्यामुळे प्रकल्प समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या विश्वासाला तडा जावू देणार नाहीत. हा प्रकल्प येथे नक्की होईल याची खात्री असल्याचे रिफायनरी समर्थक आणि कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे सचिव अविनाश महाजन म्हणाले.
रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे सचिव अविनाश महाजन नाणार पुन्हा 'पेटणार'? मुख्यमंत्र्यांचे प्रकल्पावरून मोठे विधान...
महाजनादेश यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याचे संकेत दिले. त्यामुळे प्रकल्प समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान काही राजकीय तडजोडीमुळे मुख्यमंत्र्यांना हा प्रकल्प त्यावेळी रद्द करावा लागला होता. मात्र, असे असले तरी ज्या ठिकाणी जमीन मालक जमीन देतील आणि जो जिल्हा या प्रकल्पाचे स्वागत करेल त्या ठिकाणी प्रकल्प उभारणार असल्याचे ते यावेळी म्हणाले होते. त्या गोष्टीवर विश्वास ठेवून पुढील वाटचाल सुरू ठेवली होती.
जीव गेला तरी नाणार रिफायनरी होऊ देणार नाही; ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
साधारण ८ हजार एकर जमीन मालकांची सहमती या प्रकल्पासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानमार्फत जमा झाली होती. ती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पोहचविली होती. तसेच 20 जुलैला एक मोठा मोर्चा शांततेच्या मार्गाने काढला होता. रत्नागिरी जिल्हा या प्रकल्पाचे स्वागत करतो हे देखील त्यांना सांगितले होते. याला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांचे आभार मानत असल्याचे महाजन म्हणाले. तसेच मुख्यमंत्री आमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. याठिकाणी नक्की प्रकल्प होईल, असा विश्वास महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.