महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक: जिल्ह्यात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचा वेग वाढला - रत्नागिरी लेटेस्ट

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती सुधारत आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येपेक्षा दररोज कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचा वेग वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर आटोक्यात येईल अशी शक्यता आहे.

Breaking News

By

Published : May 10, 2021, 12:09 PM IST

रत्नागिरी- जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती सुधारत आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येपेक्षा दररोज कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचा वेग वाढला आहे. तर चाचण्यांमध्ये निगेटिव्ह रुग्ण जास्त येत असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

तब्बल ९३३ जण दिवसभरात कोरोना मुक्त

रविवारी दिवसभरात तब्बल २ हजार १३१ चाचण्या करण्यात आल्या, त्यातील ५७६ जण पॉझिटिव्ह आढळलेले असले, तरी तब्बल १, ५५५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर तब्बल ९३३ जण दिवसभरात कोरोना मुक्त झाले आहेत. चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा निगेटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने, जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर आटोक्यात येईल अशी शक्यता आहे.

दिवसभरात १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू

आतापर्यंत जिल्ह्यात २६,६९१ पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. दरम्यान दिवसभरात १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृत्यूची संख्या ८०४ झाली आहे. तर ५ हजार ३८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शनिवारी दिवसभरात पॉझिटिव्ह सापडलेल्या ५७६ रुग्णांमध्ये रत्नागिरी २६०, दापोली २७, खेड ३०, गुहागर ४९, चिपळूण ६२, संगमेश्वर ६०, मंडणगड 0, लांजा ४१, राजापूर ४७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा -इथे कोरोनाला कोणीच घाबरत नाही? मालेगावकरांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन

ABOUT THE AUTHOR

...view details