महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उधाणलेल्या समुद्रामुळे धूपप्रतिबंधक बंधारा उद्धवस्त, नागरिक भयभीत - sea

गेल्या काही दिवसांपासून उसळी घेणाऱ्या लाटांनी मिर्या धूपप्रतिबंधक बंधारा पूर्णपणे उध्वस्त केला आहे. पांढरा समुद्र ते पंधरामाडदरम्यान ठिकठिकाणी बंधारा व रस्ता नामशेष झाला आहे. या भागात समुद्राने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.

उधाणलेल्या समुद्रामुळे धूपप्रतिबंधक बंधारा उध्वस्त, नागरिक भयभयीत

By

Published : Aug 3, 2019, 5:13 PM IST

रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर सध्या उधाणलेल्या समुद्रात उसळी घेणाऱ्या लाटांनी रौद्र रूप धारण केले आहे. किनारपट्टीवर उसळी घेणाऱ्या 5 ते 6 फुटांच्या लाटांनी किनारपट्टी परिसर खिळखिळा केला आहे. गेले दोन दिवस किनारपट्टी भागात लाटांचे तांडव पहायला मिळत आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.

उधाणलेल्या समुद्रामुळे धूपप्रतिबंधक बंधारा उध्वस्त, नागरिक भयभयीत

गेल्या काही दिवसांपासून उसळी घेणाऱ्या लाटांनी मिर्या धूपप्रतिबंधक बंधारा पूर्णपणे उध्वस्त केला आहे. पांढरा समुद्र ते पंधरामाडदरम्यान ठिकठिकाणी बंधारा व रस्ता नामशेष झाला आहे. या भागात समुद्राने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. समुद्राचे पाणी मानवी वस्तीत येऊन पोहचल्याने या भागात मोठा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारपासून या भागात उसळी घेणाऱ्या लाटांनी थैमान घातले होते. मोठ्या प्रमाणावर धूप झाल्याने येथील रस्तादेखील पूर्ण वाहून गेला आहे. डॉ बिर्जे व केनवकर यांच्या घरापर्यंत शनिवारी सकाळी समुद्राचे पाणी येऊन पोहोचले होते. उसळी घेणाऱ्या लाटांनी केनवकर यांच्या घराची संरक्षक भिंत व गेट समुद्राने गिळंकृत केला आहे. तसेच नारळाची झाडंही उन्मळून पडली आहे. यामुळे या परिसरात मोठी वाताहत झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून उसळी घेणाऱ्या लाटांनी त्या परिसरात थैमान घातल्याने सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी नवा धुपप्रतिबंधक बंधारा मंजूर झाला होता. मात्र अद्यापही त्यावर पुढील कारवाई झालेली नाही. यापूर्वी मिर्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या मजबूतीसाठी आंदोलने झाली. मात्र अद्यापही मिर्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या मजबूतीबाबत कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत. याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

किनारपट्टी भागात सुरू असलेल्या थैमानामुळे भाटीमीर्या, दत्तमंदिर येथील चार घरांचे छप्पर वाऱ्याने उडून गेले असून मोठ्या प्रमाणात पडझडही झाली आहे. यामुळे विक्रम नार्वेकर, किरण नार्वेकर, मिलिंद नार्वेकर आणि संजय किर यांच्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शनिवारी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी पंधरामाड परिसराला भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.

ABOUT THE AUTHOR

...view details