महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हा' पराभव राणेंना आत्मचिंतन करायला लावणारा.. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा आढावा

महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी एकतर्फी मताधिक्य घेऊन महाराष्ट्र स्वाभिमानच्या निलेश राणे यांचा दारुण पराभव केला. गेल्या वेळ पेक्षाही राऊत यांनी 30 हजारांचे मताधिक्य जास्त घेतले. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला आणखी मजबूत झाला आहे.

'हा' पराभव राणेंना आत्मचिंतन करायला लावणारा.. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा आढावा

By

Published : May 24, 2019, 6:21 PM IST

रत्नागिरी -रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंना पुन्हा एकदा जनतेने नाकारलं आहे. हे निवडणूक निकालावरून दिसून येत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध नारायण राणे अशी थेट लढत होती. निवडणुकीच्या निकालापूर्वी धक्कादायक निकालाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, ती सपशेल फोल ठरली.

'हा' पराभव राणेंना आत्मचिंतन करायला लावणारा.. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा आढावा

महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी एकतर्फी मताधिक्य घेऊन महाराष्ट्र स्वाभिमानच्या निलेश राणे यांचा दारुण पराभव केला. गेल्या वेळ पेक्षाही राऊत यांनी 30 हजारांचे मताधिक्य जास्त घेतले. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला आणखी मजबूत झाला आहे. राणेंना विचार करायला लावणारा हा पराभव आहे. या संपूर्ण निकालाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..

ABOUT THE AUTHOR

...view details