रत्नागिरी - रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ सध्या महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. रिफायनरी प्रकल्पासाठी राजापूर तालुक्यातील 46 संघटनांनी एकत्र येत एक समन्वय समिती स्थापन केली आहे. या नव्याने स्थापन झालेल्या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प समर्थ समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. याबाबत या समितीने मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेल केला आहे. आम्हाला उत्तराची अपेक्षा असल्याचं समितीचे अध्यक्ष ऍड शशिकांत सुतार यांनी सांगितलं.
रिफायनरी प्रकल्प समर्थ समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली रोजगार, आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांबरोबरच रखडलेल्या सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या मुद्यांवर तालुक्यातच नव्हे तर रत्नागिरीत प्रकल्प समर्थनार्थ आता अनेकजण पुढे येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता राजापूर तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटना, स्वयंसेवी संस्था, मंडळे पुढे सरसावली आहेत. आशा 46 संघटनांनी एकत्र येत एक समन्वय समिती स्थापन केली आहे. या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीच्या अध्यक्षपदी अॅड. शशिकांत सुतार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
समितीकडून मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेल मुख्यमंत्र्यांकडे मागितली भेटीची वेळ -
समितीच्या माध्यमातून हा रिफायनरी प्रकल्प राजापूरमध्येच व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन रिफायनरी प्रकल्पाबाबत असलेली सद्यस्थिती मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ समितीने मुख्यमंत्री कार्यालयाकडे मागितली आहे. तसा मेलही मुख्यमंत्री कार्यालयाला करण्यात आला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष ऍड शशिकांत सुतार यांनी दिली आहे.
काय म्हटलं आहे मेलमध्ये... काय म्हटलं आहे मेलमध्ये -
रत्नागिरी रिफानयरी प्रकल्प समर्थनार्थ राजापूर तालुक्यातील 46 संघटनांनी एकत्र येत, एक समन्वय समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये राजापूर तालुका व्यापारी संघ, वकील संघ, डॉक्टर असोसिएशन, सर्व शैक्षणिक संस्था संघ व विविध ज्ञाती संस्था असून सर्वांनी रत्नागिरी रिफायनरी समर्थनार्थ समन्वय समिती स्थापन केली आहे. सदर समितीचे वतीने सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना प्रत्यक्ष भेटून रत्नागिरी रिफायनरीबाबत चर्चा करुन निवेदन देणेचे आहे. तरी सन्मानीय मुख्यमंत्र्यासोबत आम्हाला लवकरात लवकर भेटीची वेळ ठरवून द्यावी ही नम्र विनंती, असे या मेलमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा -केरळमधल्या सुलेमान यांनी उभारलं बोन्साय झाडांचं साम्राज्य