रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, तरीही क्षुल्लक कारणांसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. भाजीबाजारात तर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असलेली पहायला मिळत आहे. त्यामुळे रत्नागिरी पोलिसांनी वस्ती वस्तीवर जाऊन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.
गर्दी केल्यास होईल कठोर कारवाई; पोलिसांचा इशारा
रत्नागिरीतील राजीवडा परिसरात आज(शुक्रवार) मासे खरेदीसाठी अशरक्षः झुंबड उडाली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी मच्छी मार्केट परिसरात धाव घेतली. त्यानंतर या भागाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.
हेही वाचा -COVID -19 : धारावीत आढळला तिसरा रुग्ण, डॉक्टरला कोरोनाची लागण..
रत्नागिरीतील राजीवडा परिसरात आज(शुक्रवार) मासे खरेदीसाठी अशरक्षः झुंबड उडाली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी मच्छी मार्केट परिसरात धाव घेतली. त्यानंतर या भागाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. राजीवडा परिसरातील प्रत्येक भागात फिरून पोलिसांनी लोकांना बाहेर न पडण्याचे आव्हान केले. अत्यावश्यक कारणासाठी घरातील फक्त एकानेच बाहेर पडा, सोशल डिस्टनसिंग ठेवा, अशा सूचना करण्यात आल्या. जर सूचनांचे पालन केले नाहीत, तर नाईलाजाने प्रशासनाला कारवाई करावी लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला.