रत्नागिरी- तालुक्यातील राजीवडा आणि साखरतर येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. या भागात जमावबंदीचे काटेकोर पालन व्हावे यासाठी या दोन्ही ठिकाणांवर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. साखरतरमध्ये 3 तर राजीवडा येथे एक असे चार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
रत्नागिरीतल्या राजीवडा, साखरतरमध्ये ड्रोनच्या माध्यमातून वॉच - रत्नागिरी कोरोना अपडेट्स
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर या परिसरातील 3 किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. या 3 किमीच्या परिसरात जमावबंदीचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी या दोन्ही ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे.
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर या परिसरातील 3 किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. या 3 किमीच्या परिसरात जमावबंदीचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी या दोन्ही ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. राजीवडा आणि साखरतर शहरातील दोन्ही कंटेनमेंट झोनवर प्रशासनाकडून ड्रोनच्या साहाय्याने पाहणी केली जात आहे.
नागरिकांनी कृपया घरीच राहून आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जर कोणी कायदा मोडून बाहेर फिरताना दिसलं तर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.