रत्नागिरी- कोरोनामुळे संचारबंदी असली तरी विनाकारण गाडया घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांकडून यापूर्वी अनेक वेळा समज देण्यात आली आहे. अगदी कडक कारवाईचा बडगाही उगारण्यात आला. काहींच्या गाडयाही जप्त करण्यात आलेल्या आहेत. मात्र,तरीही लोक नियम तोडून बाहेर विनाकारण फिरतात. अशांसाठी रत्नागिरी पोलिसांनी आता एक नामी शक्कल लढवली आहे. रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिर परिसरात एक 'सेल्फी'श पॉईंट उभारण्यात आला आहे.
रत्नागिरी पोलिसांची नामी शक्कल...विनाकारण बाहेर पडणाऱ्यांंसाठी उभारला 'सेल्फी'श पॉईंट - Ratnagiri police
विनाकारण गाड्या घेऊन बाहेर पडणाऱ्या वाहन चालकांकडून पोलिसांनी दंड घेतला आणि 'सेल्फी'श पॉईंटसमोर सर्व वाहन चालकांचा सेल्फी घेण्याची वेगळीच शिक्षा दिली.
विनाकारण गाड्या घेऊन बाहेर पडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांनी दंड घेऊन बसवून ठेवलेच, शिवाय या 'सेल्फी'श पॉईंटसमोर सर्व वाहन चालकांचा सेल्फी घेण्याची वेगळीच शिक्षा दिली. 'मी घरात न थांबणारा, मी कोरोना पसरवणारा, मीच मूर्ख, मी बेजबाबदार नागरिक, मी ‘सेल्फी’श असा मजकूर या बोर्डवर लिहिण्यात आलेला आहे. या बोर्ड सोबत विनाकारण बाहेर पडणाऱ्या प्रत्येक वाहन चालकांचा सेल्फी घेण्यात येत आहे.
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वाहन चालकांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.