महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यातील नेपाळी नागरिकांची माहिती मिळणार 'ID २४-७' अॅपवर - मनुष्यबळ

आंबा आणि मासेमारी कोकणातील प्रमुख २ व्यवसाय आहेत. पण या २ व्यवसायांसाठी लागणारे सर्वाधिक मनुष्यबळ हे नेपाळमधील असते. परंतु, पासपोर्टची सक्ती नसल्यामुळे नेपाळमधून येणाऱ्या अनेक व्यक्तींची नोंद सापडत नाही. त्यामुळे रत्नागिरी पोलिसांनी 'आयडी 'ID २४-७' असे अॅप विकसित केले आहे. या अॅपद्वारे नेपाळमधून येणाऱ्या मंडळींची माहिती नोंद ठेवले जाणार आहे.

रत्नागिरी पोलिसांनी ID २४x७ हे अॅप विकसित केले

By

Published : May 2, 2019, 4:57 PM IST

रत्नागिरी- कोकणातील व्यवसायासाठी लागणारे सर्वाधिक मनुष्यबळ हे नेपाळमधून पुरविली जाते. परंतु कोकणात कामानिमित्त येणाऱ्या या नेपाळ्यांची अनेकवेळा नोंद नसते. परंतु आता नेपाळमधून येणाऱ्या मंडळींची ‘कुंडली’च रत्नागिरी पोलीस अॅपच्या माध्यमातून ठेवणार आहेत. 'आयडी 'ID २४-७' तास असे या अॅपचे नाव आहे. पाहूया या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट.

रत्नागिरी पोलिसांनी ID २४x७ हे अॅप विकसित केले

आंबा आणि मासेमारी कोकणातील प्रमुख २ व्यवसाय आहेत. पण या २ व्यवसायांसाठी लागणारे सर्वाधिक मनुष्यबळ हे नेपाळमधील असते. कारण या व्यवसायातील बारीक-सारीक कामासाठी येथे नेपाळी पाहायला मिळतात. नेपाळमधील मजूर कोकणात आंब्याच्या बागेत राखण करणे, फवारणी करणे किंवा मासेमारी बोटींवर खलाशी म्हणुन काम करतात. पासपोर्टची सक्ती नसल्यामुळे नेपाळमधून येणाऱ्या अनेक व्यक्तींची नोंद सापडत नाही.

परंतु, आता या नेपाळी व्यक्तींचे नाव, गाव, कुटुंबातील नातेवाईक कुणाकडे कामाला आला आहे याची कुंडलीच ठेवली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रत्नागिरी पोलिसांनी हे शक्य केले आहे. त्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी एक विशेष अॅप विकसित केले आहे. 'ID २४-७' तास असे या अॅपचे नाव आहे. या अॅपचे खालील फायदे आहे.

१. ग्राफ इन
२. सागरी सुरक्षा कडक करण्यासाठी प्रयत्न
३. रत्नागिरी पोलिसांनी विकसित केलेले अॅप
४. नेपाळहून आलेल्या व्यक्तीची फोटोसह कळणार अॅपद्वारे माहिती
५. फोटोसह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची माहिती अॅपमधून समजणार

या अॅपमध्ये नेपाळी नागरिकांची माहिती पोलीस ठाणे निहाय संकलित करण्यात येईल. यामध्ये नेपाळी नागरिकांची वैयक्तीक संपूर्ण माहीती (संपूर्ण नाव, अलीकडील फोटो, नेपाळमधील व सध्या वास्तव्याचा पत्ता, संपर्क क्रमांक, स्वाक्षरी, किमान २ नातेवाईकांची नावे) व कंपनी/एजंट/मालक/बागायतदार/नौका मालक इत्यादींचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक, नेपाळ देशाचा नागरिक असल्याबाबतचे विधीग्राह्य प्रमाणपत्र इत्यादी माहितीचा अभिलेख तयार करण्यात येईल. त्यानंतर त्यांना पोलीस ठाणे स्तरावर बारकोड असलेले ओळखपत्र अदा करण्यात येईल. त्यामुळे प्रस्तूत अॅपद्वारे पोलीस अंमलदारांनी ओळखपत्रावरील बारकोड मोबाईलवर स्कॅन केल्यास त्यांना सदर नेपाळी नागरिकांची संपूर्ण माहिती मोबाईल स्क्रीनवर त्वरित उपलब्ध होणार आहे.

या अॅपचा वापर फक्त जिल्ह्रातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनाच करता येणार आहे. या अॅपमुळे नेपाळी नागरिकांची माहिती पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर जतन करुन ठेवणे आणि नेपाळी नागरिकांची ओळख पटविणे जिल्हा पोलीस दलासाठी अतिशय सोपे झाले आहे.

'ID २४-७' हे अॅप गद्रे इन्फोटेक प्रा. लि., रत्नागिरी यांच्याकडून तयार करुन घेण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यापुरते हे अॅप मर्यादित आहे. असे असले तरी हा प्रयत्न यशस्वी झाल्यास देशाच्या सुरक्षेचा प्रश्न पाहता या अॅपची व्याप्ती राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचू शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details