महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 9, 2020, 8:24 AM IST

ETV Bharat / state

'रेझिंग डे' सप्ताहनिमित्त समुद्रकिनारी रत्नागिरी पोलिसांची स्वच्छता मोहीम

रत्नागिरी पोलिसांनी 'रेझिंग डे' सप्ताहानिमित्त रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रकिनारी बुधवारी स्वच्छता अभियान राबवले.

स्वच्छता मोहिमेत सहभागी पोलीस
स्वच्छता मोहिमेत सहभागी पोलीस

रत्नागिरी- रत्नागिरी पोलिसांनी 'रेझिंग डे' सप्ताहानिमित्त रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रकिनारी बुधवारी (दि. 8 जाने.) स्वच्छता अभियान राबवले. हा संपूर्ण समुद्रकिनारा स्वच्छ केला. जवळपास 130 कर्मचारी आणि 15 अधिकाऱ्यांनी ही स्वच्छता मोहीम राबवली.

'रेझिंग डे' सप्ताहनिमित्त समुद्रकिनारी रत्नागिरी पोलिसांची स्वच्छता मोहीम


समुद्रकिनाऱ्यांवरचा कचरा हा प्रश्न गंभीर होत चालल आहे. अशा वेळी अनेक संस्था समुद्रकिनारा स्वच्छतेसाठी किनाऱ्याचे पालकत्व स्वीकारते. अशातच नेहमीच्या कामात व्यग्र असणाऱ्या पोलिसांनी सुद्धा समाजाबद्दल बांधीलकी दाखवली.

हेही वाचा - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात रत्नागिरी विराट मोर्चा

बुधवारी (दि. 8 जाने.) पोलिसांच्या रेझिंग-डेचा समारोप झाला. या दिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी पोलिसांनी स्वच्छतेच्या माध्यमातून अनोखा संदेश दिला. यात किनाऱ्यावरील सर्व प्रकारचा कचरा पोलिसांनी उचलत किनारा साफ केला. यामध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या, समुद्रातून वाहून आलेला ओला कचरा, असा सर्व कचरा पोलिसांनी उचलून किनारा चकाचक केला. महिला पोलीस कर्मचारीसुद्धा या स्वच्छता मोहिमेत उतरले होते. गोळा करण्यात आलेला कचरा लगेचच घंटागाडीतून देण्यात आला. विशेष म्हणजे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे सुद्धा या स्वच्छता मोहिमेत स्वतः सहभागी झाले होते. त्यांनी सुद्धा किनाऱ्यावरच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. या स्वच्छता मोहिमेत प्लास्टिक कचऱ्यासोबत दारूच्या बाटल्यांचा मोठा समावेश होता. त्यामुळे किनाऱ्यावर आपण फिरायला जाताना काळजी घेण्याची तेवढीच आवश्यकता आहे.

हेही वाचा - रत्नागिरीत विनापरवाना वाळू उपसा सुरूच; प्रशासनाचे दुर्लक्ष

रेझिंग डे कधी व का साजरा करतात

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 2 जानेवारी 1960 ला महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज सुपूर्द केला होता. हा दिवस 'रेझिंग डे' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र पोलीस दल २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान रेझिंग डे साजरा करतात.

ABOUT THE AUTHOR

...view details