रत्नागिरी -जिल्ह्यात काल ठिकठिकाणी दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. कुवारबाव येथील उत्कर्ष नगरमध्ये बालगोपाळानींही हंडी फोडण्याचा आनंद घेतला. यावेळी लहानग्यांच्या पालकांनीही या दहीहंडीत उत्साहाने सहभाग घेतला.
रत्नागिरीत बालगोपाळांची दहीहंडी उत्साहात साजरी
राज्यात शनिवारी सर्वत्र दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. रत्नागिरीतही ठिकठिकाणी दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. कुवारबाव येथील उत्कर्ष नगरमध्ये बालगोपाळांनीही हंडी फोडण्याचा आनंद घेतला.
शनिवारी राज्यात सर्वत्र दहिहंडीचा थरार रंगलेला पाहायला मिळला. गोविंदा पथकांनी मोठमोठ्या हंड्या फोडण्यासाठी प्रयत्न केले. यात चिमुकले बालगोपाळ मागे कसे राहतील. रत्नागिरीतही लहानग्यांनी अशीच दहीदंडी लावत, सणाचा आनंद घेतला.
रत्नागिरीतल्या कुवारबावमधील उत्कर्ष नगर येथील अंगणवाडीच्या लहान गोविंदांमध्ये दहिहंडीचा उत्साह पहायला मिळाला. श्रीकृष्ण, राधेच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये बालगोपाळांनी सुरेख नृत्य सादर केली. यावेळी पालकांनीही लहानग्यांच्या या दहिहंडीत उत्साहाने सहभाग घेतला. सुरवातीला श्रीकृष्णाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दहीहंडी फोडण्यासाठी लहान मुलांची लगबग सुरू झाली. सुरूवातीला कृष्णगीतांवर बालगोपाळांनी फेर धरला. त्यानंतर मुलांनी हंडी फोडली व एकच जल्लोष केला.