महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिपळूण येथील कळंबट गावात डोंगराला भेगा, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

रत्नागिरीच्या चिपळूण जवळील कळंबट गावात डोंगराला मोठ्या भेगा पडल्या आहेत. भेगा पडल्याने काही ठिकाणी जमीन खचली असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चिपळूण येथील कळंबट गावात डोंगराला भेगा

By

Published : Aug 10, 2019, 9:39 AM IST

रत्नागिरी- मुसळधार पावसामुळे कोकणात डोंगर खचण्याचा घटना वाढू लागल्या आहेत. चिपळूण जवळील कळंबट गावात डोंगराला मोठ्या भेगा पडल्या आहेत. भेगा पडल्याने काही ठिकाणी जमीन खचली असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चिपळूण येथील कळंबट गावात डोंगराला भेगा, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

कोकणात सर्वत्र जोरदार पाऊस सूरू आहे. मुसळधार पावसामुळे कोकणात डोंगर खचण्याचा घटना वाढू लागल्या आहेत. चिपळूण मधील कळंबट गावातही जवळपास 2 एकर पर्यंत डोंगराला मोठ्या भेगा पडून जमीन खचली आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गावातील घरांना धोका नसला, तरी गावातून जाणारा रस्ता खचून गेल्यामुळे रहदारीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. तर शेतीकडे जाणारे रस्ते देखील खचल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
गुरुवारी या भागात डोंगर खचायला सुरवात झाली. दरम्यान चिपळूण महसूल विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details