महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुर्यकांत दळवी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार - रामदास कदम - defamation claim

शिवसेना नेते, राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यामध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान २ दिवसांपूर्वी दळवी यांनी कदम यांच्यावर टीका करत आरोप केले होते. यावर प्रत्युत्तर देत दळवींच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे पर्यावरण मंत्री कदम यांनी जाहीर केले आहे.

रामदास कदम

By

Published : Sep 10, 2019, 4:48 PM IST

रत्नागिरी - पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर भगतगिरीचा आरोप करणाऱ्या माजी आमदार सुर्यकांत दळवींना कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कदम हे भगत असून बंगाली बाबाला सोबत घेवून भगतगीरी करत असल्याचा दावा दळवी यांनी केला होता. यावर दळवींच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे पर्यावरण मंत्री कदम यांनी जाहीर केले आहे. बाप दाखव नाहीतर, श्राद्ध घाल अशा प्रकारची आपली भूमिका राहणार असल्याचं कदम यांनी स्पष्ट आहे. ते मंगळवारी खेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

दळवींच्या आरोपावर प्रत्युत्तर देताना रामदास कदम


शिवसेना नेते, राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यामध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान २ दिवसांपूर्वी दळवी यांनी कदम यांच्यावर टीका करत आरोप केले होते. कदम हे भगत असून ते बंगालीबाबांना घेऊन फिरतात. विशेष म्हणजे कदम यांना विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी देखील त्यांनी आमच्यासोबत भगत दिला होता असा दावा दळवी यांनी केला आहे. दर अमावस्येला कदम भगतगिरी करायचे, जामगे येथील घराच्या गच्चीवर कदम आणि बंगाली बाबा रात्रभर कोहळे कापयचे असा दावा देखील दळवी यांनी केला आहे.


या आरोपांना प्रत्युत्तर देताना १५ वर्ष दळवी झोपले होते का? १५ वर्षात दळवींना या संदर्भात का आठवण झाली नाही, असा सवाल पर्यावरण मंत्र्यांनी केला आहे. विधिमंडळात जादूटोणा विधेयक मी स्वतः मांडले आहे. त्यामुळे माझ्याकडून असं काही होईल असं शेंबडं मुलसुद्धा विश्वास ठेवणार नाही असं रामदास कदम यांनी सष्ट केलं आहे. दळवीकडून खोटी आणि बदनामी करणारी वक्तव्य केली जात आहेत. दळवी यांनी ग्रामपंचायतीला शिवसेनाविरोधात आणि लोकसभेला उघडपणे राष्ट्रवादी तटकरे यांचे काम केले. त्यामुळे पक्षाच्या विरोधात काम करुन दळवी स्वतःला शिवसैनिक कसे समजतात, असा सवाल पर्यावण मंत्री कदम यांनी उपस्थित केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details