रत्नागिरी- ऐन गणेशोत्सवात जिल्ह्यात पावसाची रिमझीम सुरूच आहे. सोमवारी गणेशाच्या आगमनावेळी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. आजही (मंगळवारी) हिच स्थिती आहे. आज सकाळपासूनच पावसाच्या सरी जिल्ह्यात बरसत आहेत. त्यामुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर पावसाने पाणी फेरले आहे.
रत्नागिरीत पावसाची रिपरिप सुरुच; गणेशभक्तांच्या उत्साहावर फेरले पाणी - रत्नागिरीत पाऊस
गणेशोत्सवातच आलेल्या पाण्याने गणेश भक्तांचा उत्साह मावळला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 73.78 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे गणेश भाविकांना मात्र घराबाहेर पडणे मुश्किल झाले असून काही दिवस तरी पावसाने विश्रांती घ्यावी अशी विनंती भाविकांकडून होत आहे.
दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 73.78 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर रत्नागिरी आणि लांजा तालुक्यांमध्ये 100 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरीमध्ये 137 मिमी तर लांजा तालुक्यामध्ये 115 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर दापोली तालुक्यात 98 मिमी पावसाची नोंद झाली आहे. खालोखाल राजापूरमध्ये 73 तर मंडणगडमध्ये 66 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातही 50 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
या पावसामुळे गणेश भाविकांना मात्र घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे वरुणराजाने आता पुढचे काही दिवस तरी विश्रांती घ्यावी अशी विनवणी गणरायाच्या चरणी भाविक करत आहेत.