रत्नागिरी -मान्सून दाखल झाल्यावर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. दरम्यान आजही सकाळपासून काही वेळ पावसाची रिपरिप सुरू होती. पण 10 नंतर मात्र पाऊस गायब झाला, मात्र ढगाळ वातावरण दिवसभर होते. त्यानंतर संध्याकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. मुसळधार नसला तरी पावसाची रिपरीप पुन्हा सुरू झाली होती.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची रिपरिप; शेतीच्या कामांना येणार वेग - farm work start ratnagiri
आज सकाळी सुद्धा पावसाने हजेरी लावली, त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली, सूर्यदर्शन झाले नसले तरी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यानंतर संध्याकाळी पावसाचे पुन्हा एकदा आगमन झाले. पावसाचा जोर नसला तरी पावसाची संततधार सुरू होती. पावसामुळे बळीराजा देखील सुखावला असून आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे.
पावसाची संततधार
मान्सून दाखल झाल्यापासून पाऊस कधी सकाळी तर कधी रात्री जिल्ह्यात बरसत आहे. काल (मंगळवार) सकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर दिवसभर कडकडीत ऊन होती. त्यानंतर रात्री पावसाने पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली. आज सकाळी सुद्धा पावसाने हजेरी लावली, त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली, सूर्यदर्शन झाले नसले तरी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यानंतर संध्याकाळी पावसाचे पुन्हा एकदा आगमन झाले. पावसाचा जोर नसला तरी पावसाची संततधार सुरू होती. पावसामुळे बळीराजा देखील सुखावला असून आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे.
हेही वाचा -..म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा जळफळाट झाला आहे - खासदार विनायक राऊत