रत्नागिरी- जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. गुहागर तालुक्यातील काही भागात तीन वाजेपर्यंत कडकडीत ऊन पडलं होतं. मात्र त्यानंतर पावसाने अचानक हजेरी लावली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. अनेकजण मतदानासाठी बाहेर पडले होते. मात्र याच दरम्यान पावसाने हजेरी लावल्यामुळे खोळंबा झाला.
रत्नागिरीत पावसाची हजेरी, मतदानावरही परिणाम - rain in maharashtra
रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. गुहागर तालुक्यातील काही भागात तीन वाजेपर्यंत कडकडीत ऊन पडलं होतं. मात्र त्यानंतर पावसाने अचानक हजेरी लावली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली.
रत्नागिरीत पावसाची हजेरी
जवळपास अर्धा तास हा पाऊस पडत होता. दरम्यान रत्नागिरी, चिपळूण, खेडमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारनंतर आलेल्या या पावसामुळे मतदानावरही काहीसा परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.