महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिपळूणमध्ये दीड लाखांच्या गुटख्यासह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक जण ताब्यात - arrested

या कारवाईत 1 लाख 35 हजाराचा गुटखा, तसेच गुटखा बनविण्यासाठी लागणारा 1 लाख 20 हजार रुपयांचा कच्चा माल आणि 4 लाख 20 हजार रुपयांच्या मशिनरी असा जवळपास 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चिपळूणमध्ये दीड लाखांच्या गुटख्यासह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक जण ताब्यात

By

Published : Jul 26, 2019, 11:25 AM IST

Updated : Jul 26, 2019, 12:33 PM IST

रत्नागिरी -चिपळूण तालुक्यातील कामथे येथे बनावट गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. यात गुटख्यासह जवळपास सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कामथे येथील कृष्णा माटे यांच्या जुन्या घरी गुटख्याचा कारखाना असल्याची गुप्त माहिती चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे गुरव यांनी आपल्या चमूसह गुरुवारी रात्री या ठिकाणी छापा टाकला. यावेळी गुटख्याची हजारो पाकिटे तसेच हा गुटखा बनविण्यासाठीचे साहित्य आणि मशिनरी आढळून आल्या. यानंतर अन्न व औषध प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर या विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती.

चिपळूणमध्ये दीड लाखांच्या गुटख्यासह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत 1 लाख 35 हजाराचा गुटखा, तसेच गुटखा बनविण्यासाठी लागणारा 1 लाख 20 हजार रुपयांचा कच्चा माल आणि 4 लाख 20 हजार रुपयांच्या मशिनरी असा जवळपास 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हा गुटख्याचा कारखाना चिपळूण येथील मोहसीन मेमन चालवत होता. सध्या तो फरार आहे. पण ज्या घरी हा गुटखा बनवला जात होता ते घर जुने होते. त्या घरी कोणीही राहत नव्हते. या घराचे घरमालक कृष्णा माटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

Last Updated : Jul 26, 2019, 12:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details