महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सलग तिसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी - rains

मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. मात्र, राज्यात पाऊस येण्यासाठी अजून एक ते दोन दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. सोमवारी संध्याकाळी आभाळ दाटून आले आणि ५ च्या सुमारास राजापूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली.

सलग तिसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

By

Published : Jun 11, 2019, 8:04 AM IST

रत्नागिरी -सलग तिसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह राजापूर तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसला.

सलग तिसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. मात्र, राज्यात पाऊस येण्यासाठी अजून एक ते दोन दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. सोमवारी संध्याकाळी आभाळ दाटून आले आणि ५ च्या सुमारास राजापूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे तासभर पाऊस बरसला. पावसाचा जोर जास्त असल्याने अनेक ठिकाणी वीज आणि टेलिफोन सेवा खंडित झाली. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे आता पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details