रत्नागिरी- जिल्ह्यात आज दुपारपासून पावसाची संततधार सुरू आहे. दुपारी सुरू झालेला पाऊस संध्याकाळपर्यंत सुरू होता. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपासून पावसाची दमदार हजेरी
वायू वादळामुळे महाराष्ट्राच्या वेशीवर आलेला मान्सून पुढे गेला आहे. कोकणात मात्र गेल्या आठवडाभरात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, आज पावसाने चांगलीच हजेरी लावली.

सकाळपासून तुरळक सरी बरसत होत्या, पण दुपारनंतर मात्र या पावसाने जोर धरला. जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. दुपारी सुरू झालेला पाऊस संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार बरसत होता. या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे