अंगारकी चतुर्थी : गणपतीपुळेमध्ये भाविकांना समुद्रात प्रवेशावर बंदी - 23 नोव्हेंबर 2021
श्री क्षेत्र गणपतीपुळे याठिकाणी दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजीच्या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून ते 23 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत श्री क्षेत्र गणपतीपुळे लगतच्या समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
रत्नागिरी - कोरोना नियमांमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर मंगळवारी येणारी अंगारकी ही पहिलीच अंगारकी संकष्टी असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये भाविकांना गणपतीपुळे समुद्रात पोहोचण्यास पुढील दोन दिवस पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. जवळपास एक ते सव्वा लाख भाविक या काळात येणार असल्यानं त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी म्हटलं आहे.