महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेचे पाचही विद्यमान आमदार विनायक राऊतांना मताधिक्य देण्यात यशस्वी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निलेश राणे यांना आघाडी मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, ती सपशेल फोल ठरली. विनायक राऊत यांच्या विजयात शिवसेनेच्या ५ आमदारांनी मोलाची भूमिका बजावली.

विनायक राऊत आणि नारायण राणे

By

Published : May 24, 2019, 7:45 PM IST

रत्नागिरी- शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात तब्बल १ लाख ७८ हजार ३२२ इतक्या मताधिक्याने विजयी झाले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांचा त्यांनी दारुण पराभव केला. राऊत यांच्या विजयात शिवसेनेच्या ५ आमदारांनी मोलाची भूमिका बजावली.

विनायक राऊत विजयानंतर जल्लोष साजरा करताना

रत्नागिरी जिल्ह्यातून राऊतांना चांगले मताधिक्य मिळाले. दीड लाखाच्या जवळपास मताधिक्य राजापूर, रत्नागिरी, चिपळूण या ३ विधानसभा मतदारसंघातून मिळाले. तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राऊत यांना २७ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेसाठी हा विजय महत्वाचा आहे. दरम्यान, विनायक राऊत यांना ४ लाख ५८ हजार २२ तर, निलेश राणे याना २ लाख ७९ हजार ७०० आणि काँग्रेसच्या नवीनचंद्र बांदिवडेकर यांना ६३ हजार ३०० मतदान झाले. सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जवळपास ९ लाख मतदारांनी मतदान केले होते. त्यातली ८ लाख ८७ हजार ३२५ मते वैध ठरली.

विधानसभा मतदारसंघानुसार आकडेवारी

१. चिपळूण विधानसभा मतदारसंघात विनायक राऊत यांना ८७ हजार ६३० तर, निलेश राणे ३० हजार ३९७ मते पडली. शिवसेनेच्या विनायक राऊत यांना ५७ हजार २३३ मतांची आघाडी मिळाली.


२. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून विनायक राऊत यांना १ लाख १ हजार २५९ तर, निलेश राणे यांना ४१ हजार ७०० मते मिळाली. राऊत यांना रत्नागिरीतून ५९ हजार ५५९ मतांची आघाडी मिळाली.


३. राजापूर विधानसभा मतदार संघातून विनायक राऊत यांना ७१ हजार ८९९ तर, निलेश राणे यांना ३३ हजार ७५५ मते मिळाली. राजापूर मतदारसंघातून राऊत यांना ३३ हजार ७५५ मतांची आघाडी मिळाली.


४. कुडाळ विधानसभा मतदार संघातून विनायक राऊत यांना ६३ हजार ९०९ तर, निलेश राणे यांना ५५ हजार ७१६ मते मिळाली. कुडाळ मतदारसंघातून राऊत यांना ८ हजार १९३ मतांची आघाडी मिळाली.


५. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून विनायक राऊत यांना ७४ हजार २२३ तर, निलेश राणे यांना ४४ हजार ८४५ मते मिळाली. या मतदारसंघातून राऊत यांना २९ हजार ३७८ मतांची आघाडी मिळाली.


६. कणकवली विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे यांना ६७ हजार ८२४ मते मिळाली. तर, विनायक राऊत यांना ५७ हजार ९३ मते मिळाली. या मतदारसंघात निलेश राणे यांना १० हजार ७१३ मतांची आघाडी मिळाली. या मतदारसंघात निलेश राणे यांचे भाऊ नितेश राणे आमदार आहेत. मात्र, तरीही मतदारसंघातून अपेक्षित मताधिक्य निलेश राणे यांना मिळाले नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निलेश राणे यांना आघाडी मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, ती सपशेल फोल ठरली. उलट, राऊत यांना २७ हजारांची आघाडी मिळाली. हा राणेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details