रत्नागिरी - जिल्ह्यात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. आज जिल्हा रुग्णालयाला ५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यामध्ये त्या मृत व्यक्तीचा समावेश आहे.
रत्नागिरीत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू, मृतांची संख्या तीनवर - रत्नागिरी कोरोना पॉझिटिव्ह केसेस
गुहागरमधील तालुक्यातील जामसुदमधील ६५ वर्षीय रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला होता. आज त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज 4 ते 5 रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 52 वर पोहोचली आहे. यातील 5 जणांना यापूर्वी डिस्चार्ज देण्यात आला होता, तर एकूण तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण 44 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.